आजरा : हॉकीचे जादूगार आणि भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाची व पराक्रमाची आठवण ठेवून हा दिवस देशभर साजरा केला जातो.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आजरा महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण पोतदार, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नांडिस, मलिकार्जुन शिंत्रे, डॉ. रणजित पवार तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती आणि आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने फिटनेस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध फिटनेस चाचण्यांमध्ये आपले कौशल्य व शारीरिक क्षमता दाखवून दिली.