दि. २ ऑगस्ट रोजी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित "नशामुक्त युवा विकसित भारत 2.0" या राष्ट्रीय ऑनलाइन अभियानात आजरा महाविद्यालय, आजरा येथील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान व्यसनमुक्त समाजनिर्मिती, युवकांची सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनेत युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी नशामुक्त भारताची प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमामध्ये ४७ प्राध्यापक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ५८३ विद्यार्थी, असे एकूण ६६० जण सहभागी झाले.
या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली, सामाजिक उत्तरदायित्व आणि राष्ट्रनिर्मितीची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमानंतर सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवून प्रमाणपत्रेही प्राप्त केली.