आजरा महाविद्यालयात ‘बांबू : पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मूल्यसाखळी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

आजरा महाविद्यालयात ‘बांबू : पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मूल्यसाखळी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

आजरा महाविद्यालयात ‘बांबू : पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मूल्यसाखळी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
आजरा : 
आजरा महाविद्यालय, आजरा येथील पर्यावरणशास्त्र, व भूगोल विभाग तसेच इको क्लब, पृथ्वी ग्रीन क्लब, आजरा बांबू क्लस्टर, हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट, अश्वघोष बांबू उद्योग समूह पेरणोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बांबू : पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मूल्यसाखळी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. २५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात 
बांबू पर्यावरण अर्थव्यवस्था आणि उद्योगाची शाश्वत संधी या विषयावरील किती पत्रिकेचे प्रदर्शन आणि बांबू चे पर्यावरणीय महत्त्व या विषयावरील पोस्टरचे प्रदर्शन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आले..
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. रणजित कालेकर यांनी केले.
कार्यशाळेत बांबू तज्ज्ञ मा. सतीश कांबळे यांनी बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. बांबू हे पर्यावरणपूरक नैसर्गिक साधन असून त्याच्या लागवडीतून पर्यावरण संवर्धनासोबतच शाश्वत विकासाला चालना मिळू शकते, बांबू आणि ग्रामविकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. बांबूची मूल्यसाखळी गावपातळीवर विकसित केल्यास शेतकरी, कारागीर आणि ग्रामीण उद्योजकांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
बांबू प्रवर्तक मा. रणजित कालेकर यांनी बांबू उद्योगातील विविध संधी, बांबूचे मूल्यवर्धन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. बांबू आधारित उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मा. प्र. प्राचार्य (प्रो.) डॉ. किरण पोतदार यांनी भूषविले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी बांबू हे पर्यावरणपूरक व बहुउपयोगी नैसर्गिक साधन असल्याचे सांगून, बांबूच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी बांबू क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करून त्याचा भविष्यात उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मा. उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, मा. पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील आणि मा. अधीक्षक श्री. योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रणजित पवार यांनी केले, तर आभार प्रा. तेजस्विनी जाधव यांनी मानले.
कार्यशाळेस विद्यार्थी, प्राध्यापक, बांबू प्रवर्तक मा. कृष्णा वरेकर, चिमणी गावचे बांबू शेतकरी वसंत तारळेकर, माजी मुख्याध्यापक बाबासाहेब पाटील, पोलीस पाटील प्रशांत कांबळे, आजरा परिसरातील बांबू शेतकरी तसेच बांबू क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बांबू उत्पादनापासून मूल्यवर्धन, प्रक्रिया, उद्योग आणि बाजारपेठेपर्यंतची मूल्यसाखळी विकसित करून पर्यावरण संवर्धनासोबत ग्रामीण अर्थव्यवस्था व रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.